अनंत निर्मल शेतकरी कृषी, बचत गट व पशु-पक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण
भोर – भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने १७ ते २१ डिसेंबर २०२३ रोजी अनंत निर्मल शेतकरी कृषी, बचत गट व पशु-पक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाल्याची महिती भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकांनी दिली.
भोर शहरातील पोलीस स्टेशनच्या मैदानावर रविवारी (दि. १७) ते गुरुवार (दि. २ भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने अनंत निर्मल शेतकरी कृषी प्रर्दशन आयोजित केले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि. १७) होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे असुन प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे, पुणे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे कृषी विकास अधिकारी अशोक पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, तालुका कृषी अधिकारी देवंद्र ढगे, खरेदी विक्री संघाचे संचालक उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे संचालक विजय शिरवले व नरेश चव्हाण यांनी सांगितले. या प्रर्दशनात अत्याधुनिक कृषीतंत्रज्ञान, कृषी अवजारे, कृषी संशोधन, ट्रॅक्टर व वाहने यंत्रसामग्री, ठिबक सिंचन प्रणाली, विविध प्रकारची खते व बी-बियाणे, पशुसंर्वधन, पशु खाद्य, गृहोपयोगी वस्तू खाद्य महोत्सवाचे आयोजन असून, प्रर्दशनात विविध प्रकारचे १५० स्टाँल असणार आहेत.
यात विविध प्रकारचे तांदूळ, विविध प्रकारचे खाद्य पर्दाथाचे स्टाँल, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. दरम्यान पाच दिवस महाराष्ट्राची लोकधारा, होम मिनीस्टर, शालेय नृत्य स्पर्धा नागरिकांसाठी आयोजित केल्या आहेत. या पशु-पक्षी प्रदर्शनातील स्टाँल मंडपासह तयारी पूर्ण झाली आहे.
पुंगनूर जातीची गाय .विशेष आकर्षण
या प्रर्दशनात १ हजार ७०० प्रकारचे पशु-पक्षी कृषी प्रर्दशनात विशेष आर्कषण आहे. कमी उंचीची आणि अधिकाधिक दूध देणारी पुंगनूर जातीची गाय आणि ओडिसा येथील नंदी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय लहान मुलांसाठी बालजत्रा, खाद्य जत्रा आणी शॉपिंग मॉलही असणार आहेत.