देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक केली श्री नृसिंहाची पूजा
इंदापूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे स्वागत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे गुरुवारी (दि. 23) केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री नृसिंहाची पूजा केली व दर्शन घेतले. येथे येऊन बराच कालावधी लोटल्याने श्री नृसिंहाची दर्शनासाठी येण्याची ओढ होती. श्री विठ्ठलाची व श्री लक्ष्मी-नृसिंहाची पूजा केली आहे, हा मोठा योग आहे.
श्री नृसिंह भगवान सर्वज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही मागावे लागत नाही, मनात असेल ते सगळे मिळते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.