बारामती – उंडवडी क प (ता.बारामती) येथे दुचाकी व चारचाकी आपघत प्रकरणी पोलीसाच्या मनमानी तपासाला येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पी .ए.आपटे कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत आशि की वाहनाचा अपघात दि.४ जानेवारी २०२४ रोजी अपघात झाला. सदर अपघातातील चारचाकी वाहन अज्ञात व्यक्तीने जाळले त्यामुळे पोलीसांनी अज्ञान व्यक्ती विरोधात भारतीय दंड कलमानुसार गुन्हा दाखल केला.
त्यानंतर पोलीसांनी उंडवडी कप येथील संतोष बापुराव जराड यांना प्रस्तुत गुन्ह्यात आरोपी करून जखमीची नुकसान भरपाईच्या नावाखाली खंडणी मागणे धमकी देणे या खोट्या गुन्ह्यात भा द वी ३८६ हे वाढीव कलम लावुन अटक केली. कोर्टात हजर करत सात दिवसांची पोलीस कस्टडी मागितली.
आरोपीच्या वतीने अॅड. काकासाहेब आटोळे यांनी प्रभावी युक्तीवाद करून गुन्हा व तपासातील विसंगती कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिली. प्रस्तुतचा गुन्हा खोटा असुन या गुन्ह्यात ३८६ हे कलम लागु न होणारे कलम कसे आसा युक्तिवाद कोर्टासमोर केला. युत्कीवाद कोर्टाने ग्राह्य मानुन आरोपीस ताबडतोब आरोपातुन मुक्त करण्याचा आदेश देऊन पोलीसांना खोट्या गुन्हा दाखल का केला या बाबत कारणे दाखवा नोटीस काढली आहे .