गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अखेर जाहीर केला.अध्य्क्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांचा गटचं अधिकृत शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत हे स्पष्ट झालं. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर ट्विट करत आरोप केले आहे.
महाराष्ट्राचा महानिकाल चक्क इंग्रजीत ?
कोणी ड्राफ्ट केलं? सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 10, 2024
अंजली दमानिया यांनी ट्विट केले आहे की,’महाराष्ट्राचा महानिकाल चक्क इंग्रजीत ? कोणी ड्राफ्ट केलं? सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी ?’ असा प्रश्न विचारत त्यांनी नार्वेकरांवर टीका केली आहे.
नक्कीच कोणीतरी सुप्रीम कोर्टाचे वकील असतील. ह्यांनी फक्त वाचण्याचे काम केले.
इंग्रजीत का वाचलं? कारण त्याचे मराठीत भाषांतर येत नसावे 😊
विधान सभा अध्यक्षांना त्यातले धड शब्द पण वाचता येत नव्हते
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 10, 2024
दरम्यान, हा निकाल सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी यांनी लिहून दिल्याची शंका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मांडली आहे. निकाल लिहिणारे नक्कीच कोणीतरी सुप्रीम कोर्टाचे वकील असतील. राहुल नार्वेकर यांनी फक्त वाचण्याचे काम केले. इंग्रजीत का वाचलं? कारण त्याचे मराठीत भाषांतर येत नसावे. विधानसभा अध्यक्षांना त्यातले धड शब्द पण वाचता येत नव्हते. असं म्हणत आता नार्वेकरांवर टीका केली जात आहे.