वाघोली : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विष्णूजी शेकूजी सातव हायस्कूल, वाघोली येथे गेली ४२ वर्षे प्रयोगशाळा परिचर म्हणून सेवा करत असलेले प्रल्हाद उर्फ बाळासाहेब सातव यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ कल्याण मंगल कार्यालय, वाघोली येथे संपन्न झाला.
याप्रसंगी वाघोली ग्रामपंचायतच्या संस्था सदस्य व राज्य पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य पिरजादे एम.एम, राष्ट्रवादीचे नेते माणिक दादा सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव, माजी प्राचार्य एस.आर.बांडे, एस.बी.देसाई, नानासाहेब निंबाळकर, माजी उपसरपंच शांताराम कटके, जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, माजी सभापती कमलाकर सातव, बाळासाहेब सातव सर, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव,माजी सरपंच वसुंधरा उबाळे,व आजी माजी प्राचार्य, शिक्षक, वाघोली ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य ए. टी. कळमकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन भगवान खेडकर, रेश्मा वाघ यांनी केले. बाळासाहेब सातव (गवळी) यांनी आभार मानले.