पुरंदर तहसीलदार, पोलिसांना दिले निवेदन
सासवड – आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कथित मद्य विक्री घोटाळ्यात ईडीकडून अटक केलेला पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 23) पुरंदर तालुका इंडिया आघाडीच्या वतीने निषेध बैठक घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पुरंदरचे तहसीलदार व सासवड पोलीस ठाण्याला निषेधाचे निवेदन देण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी दडपशाही मार्गाने केलेली अटक असून इंडिया आघाडी केजरीवालांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून येणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा एकजुटीने पराभव करेल, असे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे प्रदीप पोमण, सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहुरकर, बाळासाहेब भिंताडे, बंडूकाका जगताप शिवसेनेचे अभिजीत जगताप, राजाभाऊ क्षीरसागर, राजेंद्र धोत्रे आपचे दत्तात्रय कड, संजय जगताप, राजन पवार, संदीप चौंडकर, महेश जेधे, शहाजी कोलते व इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.