राहुरी – वांबोरी उपबाजारात शनिवारी झालेल्या कांदा लिलावात १,२०८ कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा १२०५ ते १५५० रूपये, दोन नंबरचा कांदा ७०५ ते १२०० रूपये तर तीन नंबरचा कांदा २०० ते ७०० रूपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला ८०० ते ११०० रूपये भाव मिळाला. भुसार मालात ज्वारी १७०१ ते २५००, बाजरी २५०० ते २६०० गहू २१५० ते २५००, मका २००० ते २०२५, हरबरा ५१०१ ते ५४०१ तर तूर ८३०१ रूपये याप्रमाणे भाव मिळाला.