श्याम चांडक ः घोडेगावात ई-फायलिंग सेवा प्रणाली सुरू
मंचर – बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधाचा लाभ वकिलांनी घ्यावा. ई-फायलिंगमुळे न्यायालयीन कामकाजात गतिमानता येऊन काम पेपरलेस करता येईल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांनी केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात ई-फायलिंग सेवा प्रणालीचे उद्घाटन आणि सेवा प्रदान प्रसंगी पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमाद्वारे केले, यावेळी ते बोलत होते. यावेळी घोडेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. के. शेख, एम. एस. माळी उपस्थित होते.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोव्याचे विद्यमान सदस्य ऍड. ए. यू. पठाण, ऍड. राजेंद्र उमाप, पुणे जिल्हा इ फायलिंग समन्वयक ऍड. पृथ्वीराज थोरात, तसेच घोडेगाव वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक म्हणाले, वकिलांना रोजच्या केस अपडेट आणि इतर न्यायनिवाडे उपलब्ध होण्यासाठी मदत होईल. याचा लाभ वकील- पक्षकारांना होईल,
तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. प्रास्ताविक ऍड. निलेश शेळके, सूत्रसंचालन ऍड. मुकुंद वळसे पाटील यांनी केले. ऍड.अनिल पोखरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची व्यवस्था ऍड. सागर गावडे, ऍड. सुदाम मोरडे, ऍड. प्रमोद काळे यांनी पहिली.