राजगुरूनगर – खेड तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) खेड तालुका कार्याध्यक्षपदी राजगुरूनगर वकील बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. देविदास शिंदे यांची निवड झाली आहे.
अॅड. शिंदे यांना निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुका अध्यक्ष हिरामण सातकर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अॅड.दीपक चौधरी, राजगुरूनगर वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. संजय गोपाळे, अॅड. संदीप घुले, अॅड. कृष्णा भोगाडे, अॅड.रोहिदास टाकळकर, विलास शिंदे, आदित्य शिंदे, विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. देविदास शिंदे म्हणाले की, खेड तालुक्यात तरुणांचे संघटन करून देशाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाईल. समाजातील सर्व घटकातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने तालुक्यात विविध विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू युवकांचे संघटन करू, असे त्यांनी नमूद केले. राजगुरूनगर : अॅड. देविदास शिंदे यांना निवडीचे पत्र मन्यवरांच्या हस्ते देण्यात आले.