धायरी, नांदोशी बिबट्याचा धुमाकूळ
खडकवासला – धायरी नांदोशी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. धायरी येथे बिबट्याने तीन गाई वासरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे धायरी नांदोशी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धायरीचा डोंगर माथ्यापर्यंत लोक वस्तीचा विस्तार झाला आहे. जवळच वनविभागाचे क्षेत्र आहे खंडोबा डोंगर म्हस्कोबा दर्यांपासून नांदोशी ते सिंहगड किल्ल्यापर्यंत असलेल्या वन क्षेत्रात बिबट्याचा अधिवास आहे. त्यामुळे भाविक, ट्रॅकर, शेतकरी, गुराख्यांनी वनक्षेत्रात जाऊ नये. असे आवाहन वनविभागाने केले आहे.
पुणे भांबुर्डा वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी सचिन सकपाळ बिबट्याने फाडसा पाडलेल्या एका बैलाचा पंचनामा झालेला आहे. याबाबत राहुल पोकळे पांडुरंग सुपेकर व शेतकर्यांनी उपवनसंरक्षकांना निवेदन दिले आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने खबरदारीचा उपाय योजना सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
धायरी परिसरातील म्हसोबा दरा, धनगर वस्ती, खंडोबा डोंगर परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. नवनाथ कचरे, श्रीरंग पोकळे, किसन आखाडे, यांची गाई वासरे अशा तीन जनावरांचा बिबट्याने आत्तापर्यंत फडशा पाडला आहे. लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुसकान भरपाई द्यावी.
-राहुल पोकळे, अध्यक्ष राष्ट्र सेवा समूह