नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील 15 रस्त्यांच्या कामांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन 23.24 मध्ये 50-54 अंतर्गत 7 कोटी 35 लक्ष रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या पुढील रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.