पिरंगुट – येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेतसाठी गावात 66 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. एकूण 66 कॅमेरे बसवण्यात आले आहे. पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव व सरपंच चांगदेव पवळे यांच्या हस्ते या कॅमेर्यांचे उद् घाटन करण्यात आले.
पिरंगुट ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 25 ठिकाणी 66 कॅमेरे लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत निधीतून हे कॅमेरे बसविण्यात आले आहे. आगामी काळात उर्वरीत ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण ग्रामविकास अधिकारी बी. आर. पाटील, पोलीस पाटील स्वाती गोळे, माजी सरपंच मोहन गोळे, माजी सदस्य भानुदास गोळे, माजी उपसरपंच सुरेखा पवळे,
सुवर्णा नवाळे, माजी उपसरपंच विकास पवळे, अमर निकटे, ग्रामपंचायत सदस्य देविदास गोळे, महेश वाघ, मयूर केदारी, रामचंद्र नलावडे, विशाल कुंभार, पोलीस पंढरीनाथ कामठे, नितीन गार्डी, सिद्धेश पाटील, प्रशांत बुणगे, गोविंद गोळे, रवींद्र गोळे, माजी सदस्य शेखर गोळे, अमित पवळे, राजेंद्र नवाळे, धनंजय कुदळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच चांगदेव पवळे यांनी सांगितले की, या कॅमेराचा कंट्रोलरूम ग्रामपंचायत कार्यालयात राहणार आहे. याचा सर्व ग्रामस्थांना फायदा होणार असून विशेषतः महिलांच्या सुरक्षितेसाठी महत्वाचे काम होणार आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव म्हणाले, या कॅमेर्यांमुळे 66 पोलिसांचे काम एकावेळीच होणार आहे. अनावश्यक गोष्टींना आळा बसणार आहे.