आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
राजगुरूनगर – खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सातकरवाडी (सुपे) येथे आयोजित शिबिरात 41 जणांनी रक्तदान केले. तर शिवाई महिला सामाजिक संस्था यांचे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिरात 198 नागरिकांनी सहभाग घेतला.
या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांच्या हस्ते झाले. यावेळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, जिल्हा परिषद माजी सदस्या मंगल चांभारे, खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पश्चिम विभाग महिला अध्यक्षा सुजाता पचपिंड, जयसिंग दरेकर, सतीश चांभारे, भोरगिरीच्या सरपंच अर्चना वनगरे, नामदेव गोपाळे, विजय खंडागळे, विष्णू साबळे, बबन गोपाळे, डॉ. चंद्रकात हिवरकर,
शिवाजी पचपिंड, दत्ता वाळूंज, विठ्ठल वाळूंज, गणेश शिंदे, बाळासाहेब वाळूंज, अनिल सोळसे, दत्ता मुके, माजी सरपंच राजु ससाने, अरुण पिसाळ आदी उपस्थित होते.
या रक्तदान, डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिरात 198 जणांनी डोळे तपासले. 110 जणांना चष्मे वाटप केले. 41 जणांनी रक्तदान केले. पश्चिम विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.