पुणे – दुचाकीस्वार तरूणांचा पाठलाग करून त्यांना चाकूचा धाक दाखवून रोकड आणि मोबाईल चोरून नेणाऱ्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. ही घटना 6 सप्टेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास फुलगाव हवेली परिसरात घडली होती.
कपील यादव शिनगारे (23 ), दीपक रावसाहेब विटेकर (21 ), संतोष राजेंद्र भोरे (19 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमनाथ तांबे (40 , रा. भावडी )यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि त्यांचा मित्र युसूफ दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी फुलगाव परिसरात दोन दुचाकीवर आलेल्या चौघा जणांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने सोमनाथला चाकूचा धाक दाखविला. तर दुसऱ्याने युसूफला उलट्या कोयत्याने मारहाण केली. त्याशिवाय त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल असा हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे तपास करीत आहेत.