पुणे – खिडकीचे गज कापून बैठ्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ३८ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना हडपसर परिसरातील मांजरीमध्ये घडली.
अंतेश्वर गुरूडे (वय ३१, रा. राधाकृष्ण काॅलनी, मांजरी बुद्रुक ) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरूडे यांचे राधाकृष्ण काॅलनीत बैठे घर आहे. चोरट्यांनी मध्यरात्री बंद घराच्या खिडकीचे गज कापून शयनगृहात प्रवेश केला. कपाट उचकटून चोरट्यांनी तीन लाख ३८ हजार रुपयांचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.