मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणीचा खळबळजनक आरोप कऱणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांचा ठावठिकाणी लागला आहे. मागील अनेक दिवसांपासून परमबीर सिंह गायब होते. त्यामुळे ते परदेशात फरार झाल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. पॉवर ऑफ अॅटर्नीशी संबंधित असल्यानं परमबीर सिंह यांच्या ठावठिकाणाबद्दल सुगावा लागत आहे.
एका वृत्तानुसार, परमबीर सिंह हे चंदीगडमध्ये राहत आहेत. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर खुद्द परमबीर यांच्यावरही घोटाळ्याचे अनेक आरोप झाले. तेव्हापासून ते गायब होते. त्यामुळे ते परदेशात फरार झाले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत होता.
परमबीर सिंह यांनी स्वतः तयार केलेल्या पॉवर ऑफ अटर्नीवरून ते चंदीगडमध्ये असल्याचे सूचित होते. परमबीर सिंग यांनी ही पॉवर ऑफ अटर्नी चंदीगडमध्ये तयार केली आहे. कागदावर पत्ता चंदीगड असा दिला आहे. यामुळे ते चंदीगडमध्ये असल्याचा संशयाला बळ मिळालं आहे.