Pune Crime: टपरी सुरू ठेवण्यासाठी पैसे न दिल्याने तलवारीने वार; टोळक्याविरूद्ध कोंढव्यात गुन्हा

मित्रालाही केली मारहाण

पुणे – टपरी सुरू ठेवण्यासाठी पैसे न दिल्यामुळे टोळक्याने तरूणावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मित्रालाही उलट्या तलवारीने मारहाण केल्याची घटना १५ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास कोंढवा बुद्रूकमध्ये घडली. याप्रकरणी अनिल चव्हाण (वय २०, रा. अपर, बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कोंढवा बुदू्रक परिसरात अनिल यांची पानटपरी आहे. त्याबदल्यात आरोपींनी अनिलकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, अनिलने त्यांना पैसे दिले नाही. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने १५ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास अनिलला साळवे गार्डन कमान परिसरात बोलावून घेतले. पैसे न दिल्यामुळे त्यांच्यासोबत भांडण करून धमकी दिली. त्यानंतर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.

भांडणात मध्यस्थी करण्यासाठी अनिलचा मित्र आला असता,  टोळक्याने त्याला तलवारीच्या उलट्या बाजूने मारहाण केली. हातातील तलवारी हवेत उंचावून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.