मुंबई – देशात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाली आहे. वास्तविक पाहता, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमीच आहेत. मात्र केंद्र सरकारने लावलेल्या अवाच्या सव्वा करांमुळे पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोचक सवाल केला आहे.
“मेरे नसीबसे दाम कम हो रहे है”, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. तोच धागा पडकडून मलिक म्हणाले की, मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने… कोण कमनशिबी आहे, देशातील जनता की तुम्ही याचं उत्तर द्यावे.
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात मोदी म्हटले होते की, “मेरे नसीबसे दाम कम हो रहे है तो विपक्ष को क्यू बुरा लगता है, आपको नशीबवाला चाहिए की बदनशीबवाला चाहिए”, असा सवाल उपस्थितांना केला होता. दरम्यान हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली.