पुणे,दि.28 -अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तीच्यावर बलात्कार करण्यात आला. पिडीत मुलगी अत्याचारामुळे गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी बबलु नावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कारासह पॉस्कोचे कलम त्याच्यावर लावण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत 17 वर्षीय मुलगी लोहगाव येथील संत तुकाराम महाविद्यालयात शिक्षण घेते. ती महाविद्यालयात जाता येता आरोपी तीला रस्त्यात गाठून ओळख वाढवत होता.
यानंतर तीला घर दाखवण्याच्या बहाण्याने लोहगाव येथील खंडोबा माळ येथे नेऊन लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. पुन्हा आठ दिवसांनी तीला सोन्याची अंगठी करायची असल्याचे सांगत तीला माळावर नेऊन बलात्कार केला. दरम्यान मुलगी गरोदर राहिल्यावर तीच्या घरच्यांना तीच्यावर अत्याचार झाल्याचे कळाले. तीच्यावर अत्याचार नोव्हेंबर महिण्यात घडले होते.
आरोपीने तीला पेपर टाकण्याचे काम करत असल्याचे सांगितले होते. मात्र अत्याचार केल्यानंतर तो पुन्हा तीला कधीच भेटला नाही. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले करत आहेत.