पुणे,दि.28- रिक्षा चालकाला दगडाने मारण्याचा धाक दाखवत , त्याची रिक्षा जबरदस्तीने चोरण्यात आली. ही घटना मुंढवा येथे घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
विशाल दिलीप करपते (21,रा.हांडेवाडी) व विकी गोपाळ भुरघाटे(25,रा.हांडेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहे.
फिर्यादी कृणाल अग्रवाल (21,रा. येरवडा) हे त्यांची रिक्षा घेऊन मित्रासह पुणे रेल्वे स्थानकावर थांबले होते. यावेळी दोघे आरोपी प्रवाशी म्हणून त्यांच्याकडे आले. त्यांना मुंढव्याला जायचे असल्याचे सांगत रिक्षात बसले. रिक्षा मुंढवा येथील नोव्हा प्रोजेक्टसमोर आली असताना आरोपींनी दगड हातात घेऊन विशालला मारण्याची धमकी दिली.
यानंतर त्याची रिक्षा जबरदस्तीने चोरुन नेली. विशाल यांने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण देशमुख करत आहेत.