नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला व्यापले आहे. तळागाळापासून हायक्लास सोसायटी पर्यंत या कोरोनाने थैमान घातला आहे. कलाविश्वालाही याला अपवाद नाही. बॉलीवूडला विळखा घातल्यानंतर आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. कारण स्टायलिस्ट सुपरस्टार सुपरस्टार म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेताअल्लू अर्जुन याला कोरोनाची लागण झाल्याचे संगणयत आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने स्वतः चाहत्यांना याबाबतची माहिती दिली. तसेच आपल्या प्रकृतीची चिंता न करण्याची विनंती केली. सोबतच आपली प्रकृती लवकरच सुधारेल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला.
कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच त्याने विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेत, मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनाही त्याने कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Hello everyone!
I have tested positive for Covid. I have isolated myself.
I request those who have come in contact with me to get tested.
I request all my well wishers and fans not to worry as I am doing fine . Stay home, stay safe . pic.twitter.com/CAiKD6LzzP— Allu Arjun (@alluarjun) April 28, 2021
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची विनंती करत, कोरोना लसीकरण मोहिमेतही सहभागी होण्याची विनंती केली.
अल्लू अर्जुन याने सोशल मीडियावर आपण कोरोनाबाधित झाल्याचे सांगताच त्याच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांनी प्रार्थनेचा सूर आळवल्याचे पाहायला मिळाले. कोणी, गेट वेल सून म्हणत त्याला धीर दिला, तर कोणी त्याला या युद्धात जिंकण्यासाठी सदिच्छा दिल्या. या लोकप्रिय कलाकारापोटी चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि त्यांचे संदेश सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले होते.