पुणे – वानवडी येथे पेट्रोल पंपावरील मॅनेजरकडून 8 लाख 74 हजाराची रोकड लूटण्यात आली. ही घटना भर दुपारी घडल्याने खळबळ माजली आहे. मॅनेजर रोकड बॅंकेत जमा करण्यासाठी जात असताना त्याला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवत लूटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बाळासाहेब अंबुरे हा वानवडी येथील पेट्रोलपंपावर मॅनेजर म्हणून काम करतो. शनिवार आणी रविवार या दोन दिवसांतील रोकड जमा करण्यासाठी तो बॅंकेत निघाला होता. काखेत पिशवी लावून ऍक्टिव्हावरुन जात असताना, त्याला ऍक्टीव्हावरुन आलेल्या दोघांनी गाडी आडवी लावून थांबवले.
यानंतर शिवीगाळ करत व कोयता दाखवत त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. आरोपी गाडीवरुन पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणाचा तपास वानवडी पोलीस व गुन्हे शाखा करत आहेत. सय्यदनगर येथे रहाणारे आनंद लाहोली पेट्रोलपंपाचे मालक आहेत.