प्रतागड – दारूमाफियांच्या विरोधात बातमी प्रकाशित केल्यानंतर दोनच दिवसांनी एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराचे अपघाती पण संशयास्पद निधन झाले. या पत्रकाराने आपल्याला संरक्षण मिळावे, अशी मागणी पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
ABP न्यूज़ के पत्रकार सुलभ श्रीवास्तव की निर्मम हत्या।
शराब माफियाओं के ख़िलाफ़ खबर चलाने के कारण यू पी में एक पत्रकार की हत्त्या हो जाती है जबकि एक दिन पहले सुलभ जी ने ADG को पत्र लिखकर हत्त्या की आशंका जताई थी लेकिन सब सोते रहे। @ABPNews @AbpGanga pic.twitter.com/Fwpk6PE3Ti— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) June 13, 2021
सुलभ श्रीवास्तव असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याने दोन दिवसांपूर्वीच एका टीव्ही चॅनेलवर दारूमाफियाच्या बेकायदेशीर उद्योगांची माहिती प्रसारित केली होती. तेंव्हापासून त्याला धमक्या दिल्या जात होत्या. आज तीच मोटारसायकल एका पोलला धडकून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले की, श्रीवास्तव हा मोटारसायकलवरून आपल्या असराही गावाकडे परतत असताना हा प्रकार झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत्यूपूर्वी या पत्रकाराने बेकायदेशीर शस्त्र कारखान्याच्या विरोधातही बातमी दिली होती, असे सांगण्यात येत आहे.