पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वकील अशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी डीएसकेंबरोबरच त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांची बाजू मांडली. सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अॅक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आलाय.
सिंहगड पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी १३ ऑगस्ट २०१६ रोजी एफाआयआर दाखल झाला होता. या एफआयआरनुसार कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर ग्राहकाला घराचा हक्क मिळाला नाही.२०१६ साली त्यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला.
मुख्य गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी देखील डीएसके यांनी अर्ज केलेला आहे. हा अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर २६ जुलै रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे.