पुणे –शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून बाधितांची संख्या वाढतच आहे. परंतु, त्याबरोबरीनेच सक्रिय बाधितांची संख्याही वाढत आहे. गुरुवारी सक्रिय बाधितांची संख्येने 25 हजारांचा टप्पा ओलांडला असून 25 हजार 737 बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासातील बाधितांची नोंद 5 हजार 571 झाली आहे.
बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, त्याचबरोबर ओमायक्रॉन बाधितांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून संशयितांच्या चाचण्याही वाढवल्या असून, गुरुवारी दिवसभरात 19 हजार 868 चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरूवारी नोंद झालेल्या बाधितांचा समावेश करून आजपर्यंत 5 लाख 42 हजार 989 बाधित आढळले आहेत. त्यातील 5 लाख 8 हजार 119 जण बरे झाले आहेत, तर 9 हजार 133 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत मृत्यू पावलेल्या दोन जणांचा समावेश आहे. याशिवाय हद्दीबाहेरील एकाचा मृत्यू झाला आहे. सक्रिय बाधितांमध्ये 19 जण व्हेंटिलेटरवर, तर 26 जण नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.