पुणे : मंजुळ स्वर आणि बासरीवादनाची मैफल

पुणे – श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात बुधवारी (15 सप्टेंबर) “हरि-प्रसाद’ या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. रसिकांना या कार्यक्रमात बासरीच्या मंजुळ स्वरांची आणि मान्यवर कलाकारांच्या वादनाची पर्वणी अनुभवता येणार आहे.

ट्रस्टने ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ बासरीवादक पद्मभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सांगीतिक योगदानाला सलाम करण्यासाठी “हरि-प्रसाद’ या बासरीवादकांच्या अनोख्या मैफलीचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात प्रख्यात वादक राकेश चौरासिया, अमर ओक, वरद कठापूरकर, निलेश देशपांडे आणि सहकारी सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. ट्रस्टच्या www.bhaurangari.com लो या संकेतस्थळावरुन कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.