accident news : टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिंदे वासुली -चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील सावरदरी – भांबोली मुख्य रस्त्यावर टेक्‍नोटेक्‍स कंपनीसमोर भांबोलीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या हॉटेल व्यावसायिकास बेदरकार

टेम्पो चालकाने अचानक यू टर्न घेत मागून धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली आल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण गोपाळ दळवी (वय 40) असे या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी टेम्पो चालक संतोष विठ्ठल शिंदे (वय 28, रा. गडद) यास अटक केली आहे. लक्ष्मण हा आपल्या शेतजमीनीमध्ये चहा व नाश्‍त्याचे हॉटेल चालवत होता. परिसरामध्ये बऱ्याच कंपन्या असल्यातरी करोनामुळे पत्नी व मुलांसह नेटाने हॉटेल व्यवसाय करत होता.

लक्ष्मणला 15 वर्षांची मुलगी व 11 वर्षांचा मुलगा असून दोन्ही मुलं आता बापाविना पोरकी झाली. दरम्यान महाळुंगे पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण,

पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड व क्राइमचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घटनास्थळावरुन टेम्पो (एमएच 14 इएम 7682) व कंटेनर (केए 52 बी 1174) ही दोन्ही वाहने जप्त केली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.