कोथरूड (प्रतिनिधी) : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय व कोथरुड बावधान क्षेत्रीय कार्यालयाच्या कक्षेतील परदेशातून आलेल्या होम क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांचा दैनंदिन निर्माण होणारा सुका कचरा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून संकलित करून त्याची योग्य प्रकारे व्हिलेवाट लावली जात आहे.
हा कचरा संकलित करण्यासाठी दोन स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संकलन केलेला सुका कचरा महानगरपालिकेच्या कैलास स्मशान भूमी येथील प्रकल्पावर व्हीलेवाट लावण्यासाठी पाठविण्यात येत आहे. हे कचरा संकलन चार बिगारी व दोन प्रभारी मोकादम यांच्या माध्यमातून करण्यात येत असून सदर सेवकांना कचरा कशापध्दतीने संकलन करणे या बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राजू मुलतानी, संजय खंडागळे,रामचंद्र वारला,कशप्पा धनगर,लक्ष्मण निकाशे,रामचंद्र भालशंकर,गणेश शेराटे,कौस्तुभ हैदराबादकर मोकादम मुकूंद पाटील हे प्रशिक्षित कर्मचारी हा कचरा गोळा करतात.
वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे , कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त कदम , व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दिपक ढेलवान यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे.