Entertainment : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) ‘सॅम ‘बहादुर’ (Sam Bahadur) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते देखील त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यापूर्वी सॅम बहादुर नवं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या नव्या पोस्टरनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यातील विकीचा हटके लुक अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
विकी कौशलच्या सॅम बहादुर चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो एका जिपवर बसलेला दिसत आहे. त्याच्या हातात काठी आणि डोक्यावर टोपी दिसत आहे. विकीनं हा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “SAM IS HERE!!!” तसेच विकीनं सॅम बहादुर चित्रपटाचं हे पोस्टर शेअर करुन या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र त्यापूर्वीचं चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सॅम बहादुर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या टीझरला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. दरम्यान, या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लूची व्यक्तिरेखा सान्या मल्होत्रा साकारणार असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेखला पाहायला मिळणार आहे. मेघना गुलजार यांनी सॅम बहादुर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.