पुणे : डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणात एकाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांनी जामीन मंजुर केला आहे. अजय मिडगुले असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. अभिषेक अवचट आणि अॅड. दीपक नागवडे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. ( pune crime )
शिरूर तालुक्यातील उबाळे वस्ती, टाकळी हाजी येथे १७ मार्च २०२२ रोजी ही घटना घडली होती. बाळू बारहाते (वय ४७) असे खून झालेल्याचे नाव आहे. घोडनदीच्या पात्रात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह टाकून देण्यात आला होता.
भानुदास वाळुंज आणि मिडकुले या दोघांना या प्रकरणात शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. तपास पूर्ण झाला आहे. आरोपी एक वर्ष सात महिन्याहून अधिक काळ कारागृहातता आहे. लवकर ट्रायल सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी अॅड. अभिषेक अवचट यांनी केली.