पुणे – शार्ट फिल्ममध्ये अभियनचे काम मिळवून देण्याच्या अमिषाने बलात्कार केल्याप्रकरणात दिग्दर्शकाला व्ही.ए.पत्रावळे यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा लागू होत नाही. दोघांनाही चित्रपट विषयामध्ये रस होता. यातून संमतीने संबंध निर्माण झाले आहे. चार वर्षे प्रेमसंबंध सुरू होते. विलंबाने एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याला तिच्याशी खरोखर लग्न करायचे होते.
चांगले करिअर खराब करायचे नव्हते. त्यामुळे जामीन देण्याची मागणी ऍड. तुषार चव्हाण यांनी केली. चव्हाण यांना ऍड. विपीन मिश्रा आणि ऍड. शंकर कदम यांनी मदत केली. दोघे शुटींगच्या वेळी अनेकदा एकत्र असायचे. त्यावेळी तिची आईही तिथे उपस्थित असायची, याबाबतचे फोटोही न्यायालयात दाखल करण्यात करत जामिनाची मागणी करण्यात आली.
समीर बाळू निकम असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने ऍड. तुषार चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. तिचे लग्न झाले असून, तिला दोन मुले आहेत. तिला अभिनय करायला आवडते. एका व्यक्तीमार्फत दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघात मैत्री आणि प्रेमसंबंध निर्माण झाले.
ऑक्टोबर 2017 त्याने नऱ्हे येथे घरी बोलावून तिच्या इच्छेविरूध्द शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारवार संबंध आले. तो मुले सोडून घरी राहायला यावे आणि लग्नासाठी तिला फोर्स करू लागला. फोन उचलत नाही म्हणून वाढदिवसा दिवशी घरी जावून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.