पुणे – पुणे-सातारा रोड वरील सिटीप्राईड थिएटर जवळ असणाऱ्या एका दुकानात आज सकाळी ८ :४० च्या सुमारास आग लागली आहे. घडनास्थळी अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाली असून, जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, ही आग शितल बार रेस्टॉरंट ला लागली असल्याचे बोलले जात आहे. आगशॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगेत हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.