वडगावशेरी -महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आकर्षित करण्यासाठी खराडी येथे उभारलेला ऑक्सिजन पार्कचा “जिवंत देखावा’ अवघ्या दीड वर्षांतच कोसळून पडला आहे. तब्ब्ल दोन कोटी रुपयाचे बजेट असलेल्या पार्कची मातीही अजून काढण्यात आलेली नाही. त्यामुळे पार्कचे भवितव्य सध्यातरी अंधातरीच आहे.
खराडी, वडगावशेरी, चंदननगर आणि परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी राज्य शासनाने खराडी येथे ऑक्सिजन पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, तब्ब्ल दीड वर्षांचा कालावधी उलटूनही आरक्षित जागेवरील मातीही अजूनपर्यत हटविली नाही. त्यामुळे हे उद्यान कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नागरिकही बुचकाळ्यात…
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी पार्कसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याचे भूमिपूजनही पवार यांच्याच हस्ते झाले होते त्यामुळे या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा होती. विशेष म्हणजे अवघ्या सहा महिन्यांतच पवार हे या पार्कच्या समोरच खासगी कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, त्यांनी पार्कची आणि तेथील कामाची साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे हा पार्क होणार अथवा नाही याबाबत नागरिक बुचकळ्यात पडले आहेत.
यायाबाबत अनेकवेळा राज शासन आनि महापालिकेला निवदने दिली आहेत. मात्र, त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे हा पार्क होणार अथवा नाही. तसेच मंजूर झालेला निधी कोठे गेला, याबाबत माहिती द्यावी.
– कुणाल सुनील, गायकवाड, उपाध्यक्ष, विद्यार्थी आघाडी, पुणे शहर
ही जागा मोकळी असल्याने त्या जागेचा गैरवापर होत आहे. त्याचा त्रास आसपासच्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
शंकर संगम, विभागप्रमुख, शिवसेना (शिंदे गट).