पुणे – दि पूना मर्चंट्स चेंबरची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अचानक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुकीचा पेनल निर्माण झाला होता. मात्र, आतो नवीन निवडणूक अधिकाऱ्यांची निवड होऊन ही प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येत्या सोमवारी (दि. ६) मतदान होणार आहे.
चेंबरच्या कार्यकारिणीच्या द्विवार्षिक निवडणुकीकरीता एकूण ४६ उमेदवारांनी अर्ज नेले होते. परंतु एकूण ४४ उमेदवारांचे अर्ज भरून परत आले होते. छाननीत वैध ठरलेल्या ४२ अर्जापैकी १० जणांनी आपले अर्ज परत घेतल्यामुळे कार्यकारी मंडळाच्या १५ जागांकरिता आता ३२ उमेदवार उभे आहेत. मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी अॅड. मकरंद आडकर, अॅड. संकेत बोरा, अॅड. आशिष कांकरिया व ऑफिस सेक्रेटरी हर्षदा मोझर यांनी संयुक्त बैठक घेऊन निवडणूक प्रक्रियाबद्दलच्या बऱ्याच वादाच्या विषयांचे निरसन केले.
दि पूना मर्चंटस् चेंबरच्या द्विवार्षिक निवडणुकीचे मतदान येत्या सोमवारी (दि.६) रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत दि पूना मर्चंटस् चेंबरच्या गुलटेकडी येथील व्यापार भवनमध्ये होणार आहे. मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. दि पूना मर्चंटस चेंबर ही शहरातील र गुलटेकडी मार्केटयार्ड, नाना, भवानी, गणेश आणि रविवार न्द पेठेतील जीवनावश्यक खाद्यान वस्तुंचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संघटना आहे. या संघटनेचे ५५७ सभासद आहेत.
निवडणुकीतील उमेदवार
अशोक आगरवाल, आनंद आगरवाल, राजेंद्र बाठिया, उत्तम बाठिया, अजित बोरा, जवाहरलाल बोथरा, राजमल भन्साळी, प्रवीण चोरबेले, हरीराम चौधरी, आशिष दुगड, अशोक गोयल, मुकेश गोयल, नवीन गोयल, शुभम गोयल, कन्हैयालाल गुजराथी, राजेंद्र गुगळे, सतीश गुप्ता, राजेश जाजू, गिरीश कटारिया, अशोक लोढा, अनिल लुंकड, दिनेश मेहता, विजय मुथा, ईश्वर नहार, प्रकाशकुमार नहार, रायकुमार नहार, सुनील नहार, विजय नहार, कुणाल ओस्तवाल, दिलीप रायसोनी, वालचंद संचेती, अजित सेटीया.