पुणे – कोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून रखडलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २६ डिसेंबरला सकाळी ८.३० ते दुपारी ३ पर्यंत मतदान होणार आहे.. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीनंतर निकाल घोषित होणार आहे. अॅड. दौलत हिंग है निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.
मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, केळी, पान आणि कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची ही संघटना आहे. यामध्ये सुमारे ८८० ते ८९० आडते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अध्यक्ष पदासाठी सर्व आडते थेट मतदान करणार आहेत.
अध्यक्षाबरोबर भाजीपाला विभागातून ८, फळ विभागातून ४, केळी, पान विभागातून प्रत्येकी १ आणि कांदा बटाटा विभागातून ४, असे एकूण अठरा संचालक निवडून येणार आहेत. ६ ते ८ डिसेंबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्ज मिळणार असून, याच कालावधीत अर्ज भरायचे आहेत. मार्केट यार्डातील पान बाजार येथील असोसिएशनच्या हॉल येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून हे फॉर्म मिळणार असून, तेथेच भरायचे आहेत. १२ डिसेंबरला अर्जाची छाननी होणार आहे. १३ डिसेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. २६ डिसेंबरला दुपारी २ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिक्शी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, उमेदवारांना चिन्हाचे वाटप होणार आहे.