पुणे : 1 कोटी 25 लाखांचा गांजा जप्त

पुणे – कस्टमच्या पुणे विभागाने एका ट्रकचा पाठलाग करून 1 कोटी 25 लाख 32 हजार 200 रुपयांचा गांजा व इतर ऐवज हस्तगत केला आहे. हा गांजा ट्रकमध्ये छुपा कप्पा तयार करून त्यामधून 149 पॅकेटमध्ये ठेवण्यात आला होता. याचे एकूण वजन 835.48 किलो इतके आहे. या ट्रकला एका इनोव्हा कार एस्कॉट करत होती. ट्रक चालक, क्‍लिनर आणी इनोव्हामधील तीन व्यक्‍तींसह पाच जणांना कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

डायरेक्‍टर ऑफ रेव्हयून्य इंटेलीजंन्स कार्यालय आणी कस्टम विभागाने रविवारी ही कारवाई केली. हा ट्रक मंचर निरगुडसर रस्त्यावर पिंपळगाव खडकी येथे पकडण्यात आला. ट्रकचालक अमित ज्ञानेश्‍वर बिडकर, क्‍लिनर दिपक आणी इनोव्हातील लियाबकस बाबामियॉ मुंडे, गुंडू राव पाटील, नासीर गफुर पठाण अशी अटक आरोपींची नावे आहेत.

कस्टम विभागाला मिळालेल्या माहितीनूसार त्यांनी सापळा रचून ट्रकवर देखरेख ठेवली होती. यावेळी त्यांना संबंधीत ट्रकच्या पुढे एक इनोव्हा गाडी ट्रकला एस्कॉर्ट करताना आढळली. या ट्रक व इनोव्हाला रस्त्यात अडवून त्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यानंतर ट्रकची पहाणी केली असता, त्यामध्ये गांजाची वाहतूक करण्यासाठी खालच्या बाजूला एक छुपा भाग बनवण्यात आला असल्याचे आढळले. त्यावर एक लोखंडी पत्रा टाकून तो झाकण्यात आला होता. त्याचे स्क्रू काढल्यानंतरच छुपा कप्प्यामधील लपवलेली गांजाची पाकिटे आढळून आली. ट्रक, इनोव्हा आणी 845 किलो गांजा असा 1 कोटी 25 लाख 32 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. डायरेक्‍टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजंन्सचे रिजनलचे नवे युनिट पुण्यातून कार्यरत झाले आहे. त्यांनी केलेली ही महिनाभरातील सर्वात मोठी कारवाई आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.