पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) -खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बेताल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात चेन्नई येथील कोयमबेडू स्टेशन चौकात तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष पी.के.नरेश कुमार आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून व जोडे मारुन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सचिव अनिथा, नादना सबपथी, युवकाध्यक्ष एसडीएच राजन, चेन्नई दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजू, चेन्नईचे दक्षिण पूर्व अध्यक्ष शिवशंकर, जया कुमार, सूर्य प्रकाशम, रघु, युवक सरचिटणीस वेधा कृष्णन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
इम्रान शेख म्हणाले की, मंत्री अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज आला आहे. संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या बद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही. कॉंग्रेसशी गद्दारी करून शिवसेनेत प्रवेश केला, मग शिवसेनेशी गद्दारी करून मंत्रीपद मिळवल. असे बेताल वक्तव्य पाहून इथून पुढे तुमच्या घरातील महिला देखील तुम्हाला मत देणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी करत नैतिकतेचा टिळा लावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्काराची गोडवे गाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ईडी सरकार या बेताल भाषा वापरणाऱ्या सत्तार यांचा राजीनामा घ्यावा.
तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष पी. के. नरेश कुमार म्हणाले, मंत्री सत्तार यांनी खासदार सुळे यांच्या बद्दलची भाषा वापरली ती भाषा भारतीय संस्कृतीला शोभणारी नसून त्याचा आम्ही निषेध करतो. यापुढे कोणीही आमच्या नेत्यांना अशी प्रकारची भाषा वापरल्यास तामिळनाडूमध्ये जोडे मारो आंदोलन घेत आहोत उद्या महाराष्ट्रात येऊन जोडे मारायला आम्ही कमी
करणार नाही.