वाघोली : भारत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाघोली तालुका हवेली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी हल्ल्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन निषेध नोंदविला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कोलते, रामभाऊ दाभाडे,शांताराम कटके, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा भोरडे, लोचन शिवले,बाळासाहेब सातव पाटील,
वाघोलीच्या माजी सरपंच वसुंधरा उबाळे, शिरसवडी च्या सरपंच सीमा गावडे,माजी सरपंच योगेश शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे युवा नेते नवनाथ आव्हाळे, प्रहार संघटनेचे राज्याचे नेते धर्मेंद्र सातव पाटील,किसन जाधव,मंगेश सातव,साईनाथ वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे.
राजेंद्र सातव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते