परमबीर सिंग यांना पुन्हा दिलासा; 15 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पुन्हा मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना आता 15 जूनपर्यंत अटक होणार नाही. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ऍट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्हाच्या संदर्भातील सुनावणीत परमबीर सिंग यांना दिलासा मिळाला आहे.

अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केली आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

या प्रकरणी ऍट्रॉसिटी ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल करुन हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचाही आरोप करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणावरून परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.