करोनाच्या प्रादुर्भावामुळे मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा रद्द

पिंपरी – करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. शहरी भागात नियमांमध्ये शिथिलता असली. तरी, ग्रामीण भागामध्ये अजूनही करोनाचे संक्रमण होत आहे. त्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

सालाबादप्रमाणे श्री मंगलमूर्तींची यांत्रा संपन्न होत असते. या वर्षी होणारी ज्येष्ठी यात्रा दिनांक 13 ते 15 जून 2021 या दिवशी होणार होती. परंतु, शासनाच्या आदेशानुसार 15 जून पर्यंत जिल्हाबंदी, संचारबंदी जमावबंदी व वाहतूक मनाई आहे. त्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

शहरी भागात जरी नियमांमध्ये शिथिलता केली असली. तरी, ग्रामीण अद्याप करोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.