दक्षिण सागर हा जगातील पाचवा महासागर

नॅशनल जिओग्राफीक कडून मान्यता

वॉशिंग्टन – पृथ्वीच्या दक्षिणेकडील सागराला जगातील पाचवा महासागर म्हणून नॅशनल जिओग्राफीक या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून मान्यता देण्यात आली आहे. जागतिक सागर दिनाच्या औचित्याने ही घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण महासागर हे समुद्री पर्यावरणातील एक महत्त्वाचे स्थान आणि दक्षिण गोलार्धातील प्रमुख केंद्रबिंदू आहे.

अंटार्टिकाला याच महासागराने वेढलेले आहे. अंटाटूर्ओकाच्या किनारपट्टीपासून याला सुरूवात होते. दक्षिणाकडे 60 अंश अक्षांशांपासून ते ड्रेक पॅसेज आणि स्कॉशिया समुद्र वगळून पृथ्वीवर अस्तित्त्वात असलेल्या इतर चार महासागरापैकी ऍटलांटिक, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर या तीन महासागरांच्या सीमांना हा महासागर स्पर्श करतो. अन्य महासागरांपेक्षा याचे वागळेपण म्हणजे त्याभोवती असलेल्या भूभागाऐवजी पाण्यामध्ये सध्या असलेले प्रवाह हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रांताच्या उत्तरेकडील भागांपेक्षा या भागातील प्रवाह थंड आणि कमी खारट पाण्याचे आहेत.

अंदाजे 34 दशलक्ष वर्षांहून अधिक जुन्या या प्रवाहामुळे दक्षिण महासागराचे पर्यावरणशास्त्रीय महत्व अधिक वेगळे आहे, या महासागरामध्या हजारो प्रजातींसाठी एक अनन्य अधिवास उपलब्ध करून दिला गेला आहे, असे नॅशनल जिओग्राफिकने आपल्या मासिकात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.