बारामती – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे अपशब्द उच्चारल्याबद्दल बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरुदद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तर त्यांचे पोस्टरही जळण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत घोषाबाजी देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शरद पवार यांच्याबद्दल पडळकर यांनी उच्चारलेले शब्द चुकीचे असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ, तालुका युवकाध्यक्ष राहुल वाबळे, साधू बल्लाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क तसेच सॅनेटायझर्सचा वापर करीत आंदोलन केले गेले.
ज्यांना बारामतीत डिपॉझिट राखता आले नाही, ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून येता आले नाही, त्यांनी शरद पवार यांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यावर टीका करणे निषेधार्ह असल्याचे अमर धुमाळ यांनी सांगितले. पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा घेतल्या.