Pro Kabaddi : प्रो कबड्डी लीगने केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात लोकप्रिया मिळवली आहे. भारताबरोबर जगभरात या स्पर्धेमुळे अनेकांना कबड्डीकडे आकर्षित केले आहे. या स्पर्धेत परदेशी खेळाडूंचाही सहभा असल्यामुळे खेळाची पातळी आणि लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये प्रामुख्याने इराण, श्रीलंका आणि दक्षिण कोरियाचे खेळाडू अधिक प्रमाणात खेळले आहेत. त्यातही विशेष करुन इराणच्या खेळाडूंनी प्रो कबड्डी लीगवर आपली मोठी छाप सोडली आहे.
1. फझेल अत्राचली | Fazel Atrachali
फझेल अत्राचली प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट परदेशी खेळाडू आहे. आपल्या आक्रमक खेळामुळे त्याला मोठा चाहतावर्ग मिळाला आहे. इतकेच नव्हे तर, अत्राचलीने आंतरराष्ट्रीय स्तरावरली आपला दरारा निर्माण केला आहे.
फझेल आत्राचलीने आपल्या खेळाबरोबर नेतृत्त्व कौशल्याचेही सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. याचमुळे यू मुंबाने गेल्या काही वर्षांपासून आपल्या संघाची कमान त्याच्याकडे सोपवली आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये 2015 ला पदार्पण करणार्या फझेलने 104 सामन्यांमध्ये बचाव करताना सर्वाधिक 319 आणि चढाई करताना 4 असे एकूण 323 गुण मिळवले आहेत.
2. अबोझर मोहजरमिघानी | Abojhar Mohajaramighani
अबोझर मोहजरमिघानी याने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर जगातिल उत्कृष्ट बचावपटू म्हणून नाव कमावले आहे. उजव्या कोपर्याला खेळणार्या अबोझर त्याच्या पदार्पणाच्या मोसमात, स्पर्धेतील पाचवा सर्वोत्तम बचावपटू ठरला होता. तेलुगू टायटन्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्याकडून खेळताना अबोझरने आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडवले होते. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या अबोझरचा 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या सुवर्णपदक विजयात सिंहाचा वाटा होता. त्याने प्रो कबड्डी लीगमध्ये आत्तापर्यंत 63 सामने खेळताना 160 गुण मिळवले आहेत.
3. ली जांग -कुन | lee jang-kun
प्रो कबड्डी लीगमध्ये परदेशी खेळाडूंमध्ये इराणच्या खेळाडूंचे वर्चस्व आहे. मात्र, दक्षिण कोरियाचा ली जांग-कुन अपवाद आहे. आक्रमक खेळ करणारा ली लीगमधील अव्वल परदेशातील चढाईपटू आहे. त्याच्याकडे पारंपरिक कबड्डी कौशल्य आणि मार्शल आर्ट्सच्या मिश्रणासह आक्रमण करण्याची एक अनोखी शैली आहे. हेच वेगळेपण त्याला कबड्डी क्षेत्रातील अव्वल दर्जाचे खेळाडू बनवले.
ली जांग-कुनने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीतील 106 सामन्यांमध्ये एकूण 496 गुणांची लयलुट केली आहे. यामध्ये चढाई करताना 471 तर बचाव करताना 25 गुण मिळवले आहेत.
4. मिराज शेख | Miraj Sheikh
इराणचे कर्णधारपद भूषवलेला मिराज शेखची आंतरराष्ट्रीय स्तरावर निडर अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. चढाई करताना समोर कोणता खेळाडू आहे याची पर्वा न करता त्यांच्यावर वर्चस्व गाजवणे हे मिराजला वैशिष्ट आहे. 2015 मध्ये पदार्पणाच्या हंगामातच मिराजला तेलुगु टायटन्सचे कर्णधारपद मिळाले, तसेच तो लीगमध्ये नेतृत्व करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. मिराजने प्रो कबड्डी लीगच्या कारकिर्दीत 99 सामन्यांमध्ये चढाई करताना तब्बल 350 तर बचाव करताना 54 गुण मिळवले आहेत.
5. हादी ओश्तोराक | Hadi Oshtorak
इराणचा अष्टपैलू हादी ओश्तोराक प्रो कबड्डी लीगच्या विजेतेपदाची हॅट्रिक करणार्या पटना पायरेट्स संघाचा भाग होता. त्याने या तीन हंगामात पायरेट्सच्या विजयी मोहिमेत मोलाची भूमिका निभावली. परिस्थितीनुसार आपल्या संघासाठी आक्रमण आणि बचावात्मक खेळ करणारा हादी मोलाचा खेळाडू ठरतो. हादी ओश्तोराक प्रो कबड्डीच्या कारकिर्दीत पायरेट्स व्यतिरिक्त यू मुंबा आणि गुजरात जायंट्ससाठी खेळताना 73 सामन्यांमध्ये 124 गुणांची कमाई केली आहे.