मुंबई – अस्थलांतरित कार्य गटासाठी एक संपूर्ण वर्षासाठी व्हिसा देण्यासाठी अमेरिकेच्या गृहखात्याने व्यक्तिगत मुलाखतीतून सूट देण्यात आली आहे. त्यात पत्नी आणि अवलंबून असणाऱ्या मुलांचा समावेश आहे. ही सवलत 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर तात्पुरत्या कार्य व्हिसाधारकांचे अनुकूल परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे अस्थलांतरित कर्मचाऱ्यांना सोयी पुरवण्यासाठी आणि व्हिसा मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे गृहखात्याच्या निवेदनात नमूद केले आहे. अस्थलांतरणावर आधारित व्हिसासाठी केलेल्या व्यक्तिगत अर्जांचा निपटारा करण्यासाठी आयोजित व्यक्तिगत मुलाखती 31 डिसेंबरपर्यंत स्थगित केल्या आहेत.
खालील वर्गासाठी सवलती
विशेषीकृत व्यवसाय (एच-1बी व्हिसा), प्रशिक्षण अथवा विशेष शिक्षण प्रवासी (एच-3 व्हिसा), कंपनी अंतर्गत बदल्या (एल व्हिसा), असाधारण क्षमता असणाऱ्या व्यक्ती (ओ व्हिसा), खेळाडू, कलाकार आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती (आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समारंभात सहभागी होणाऱ्या व्यक्ती (क्यू व्हिसा) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (एफ आणि एम व्हिसा) आणि विद्यार्थी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत (जे व्हिसा) देण्यासाठी पुढील वर्षाच्या डिसेंबरपपर्यंत मुलाखती घेण्याचे अधिकार दूतावासातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.