Pro Kabaddi League 2023 : प्रो कबड्डी लीगच्या 10व्या हंगामाला सुरुवात होण्यास दोन आठवडेही शिल्लक नाहीत. कबड्डीच्या या धमाकेदार स्पर्धेला 2 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गुजरात जायंट्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादमधील ‘द एरिना बाय ट्रान्सस्टेडिया’ येथे हा सामना होणार आहे.
या मोसमात साखळी टप्प्यात 12 संघांमध्ये एकूण 132 सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून पुढील वर्षी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. म्हणजे तीन महिने या स्पर्धेचा चाहत्यांना आनंद घेता येणार आहे . हे सर्व सामने 12 शहरांमध्ये खेळवले जातील. सर्व संघ प्रत्येक शहरात 6-6 दिवस राहणार आहेत. त्यानंतर हा ताफा (स्पर्धा) पुढे-पुढे जात राहिल.
IPL 2024 Auction : ‘हा’ 23 वर्षीय खेळाडू ठरू शकतो IPL इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर…
पहिले 6 दिवस अहमदाबादमध्ये सामने खेळवले जातील आणि नंतर बेंगळुरू, पुणे, चेन्नई, नोएडा, मुंबई, जयपूर, हैदराबाद, पाटणा आणि नंतर दिल्ली आणि कोलकाता मार्गे हा ताफा पंचकुला येथे पोहोचेल. साखळी सामन्यानंतर प्लेऑफ आणि फायनल लढती होतील, त्याचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
सामन्यांची वेळ काय असेल?
यावेळी एका दिवसात दोनपेक्षा जास्त सामने खेळवले जाणार नाहीत. ज्या दिवशी दोन सामने होणार आहेत, त्या दिवशी पहिला सामना रात्री 8 वाजता सुरू होईल आणि दुसरा सामना रात्री 9 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ज्या दिवशी एक सामना खेळायचा आहे, तो सामना 9 वाजता सुरू होईल. तसे, बहुतेक दिवशी दोन सामने खेळले जातील. दर सहा दिवसांनी विश्रांतीचा दिवस असेल. कारण सर्व संघ एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणार आहेत.
New Rule In T20I & ODI Cricket : क्रिकेट होणार आणखी फास्ट, ICC एक नवा नियम आणणार अंमलात…
तुम्ही थेट सामना कुठे पाहू शकाल..?
कबड्डीप्रेमींना हे सामने केवळ स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचा विकल्प तर आहे. पण ते घरबसल्या टीव्ही आणि अॅपवरही थेट लाईव्ह सामने पाहू शकणार आहेत. प्रो कबड्डी सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर केले जाईल. त्याच वेळी, थेट प्रक्षेपण(लाइव स्ट्रीमिंग) डिस्ने + हॉट स्टार वर उपलब्ध असेल.