पुणे – अल्टीमेट खो-खोच्या दुसऱ्या पर्वासाठी पुनित बालन (Punit Balan) यांच्या सह मालकीच्या मुंबई खिलाडीज संघाने प्लेअर्स ड्राफ्टमधून 26 प्रतिभावान खेळाडूंनी निवड केली आहे आणि हा प्लेअर्स ड्राफ्ट भुवनेश्वर येथे पार पडला. मुंबई खिलाडीज संघाने उदयोन्मुख तरुणांना संधी देण्यावर लक्ष केंद्रित करून हे खेळाडू निवडले आहेत. त्यांनी ओडिशातील 16 वर्षीय सुनील पात्राची निवड केली आहे. त्यांनी मुंबईचा मुलगा अनिकेत पोटे आणि सुभाष संत्रा यांच्यासह मागच्या पर्वात अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.
आम्ही गजानन आणि श्रीजेश यांना संघात कायम ठेवले आहे. हा एक चांगला ड्राफ्ट होता आणि महाराष्ट्रातील सुमारे 8 ते 10 खेळाडू मुंबई खिलाडीजसाठी (Mumbai Khiladis) खेळतील. गेल्या मोसमात संघाचा भाग असलेल्या काही खेळाडूंचीही आम्ही निवड केली आहे. या खेळात तुम्हाला तंत्र तसेच तरुण खेळाडू आवश्यक आहेत, कारण ते वेगवान आहेत. असे संयोजन लक्षात घेऊन, आम्ही आगामी हंगामासाठी 26 खेळाडूंचा संघ तयार केला आहे आणि मला आशा आहे की ते चांगली कामगिरी करतील, असे मुंबई खिलाडीजचे सह-मालक पुनित बालन म्हणाले.
मुंबई खिलाडीज संघ हा पुनित बालन, जान्हवी धारिवाल बालन आणि बादशाह यांच्या सह-मालकीचा आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडिया (घघऋख) च्या सहकार्याने अमित बर्मन यांनी प्रोत्साहन दिलेले, अल्टीमेट खो खो स्वदेशी खेळाच्या वाढीची पुनर्कल्पना करण्याच्या आपल्या ध्येयात स्थिर आहे.
महाराष्ट्र केसरीनंतर ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिकण्यांचे स्वप्न – सिंकदर शेख
एकूण 145 ड्राफ्ट तयार केलेल्या खेळाडूंमधून 33 खेळाडू हे 16 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत, असे अल्टीमेट खो खोचे सीईओ आणि लीग कमिशनर तेनसिंग नियोगी यांनी सांगितले. सीझन 2 प्लेअर्स ड्राफ्टसाठी 18 राज्यांमधून एकूण 293 खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती, कारण फ्रॅंचायझींनी संघात कायम राखलेल्या 18 खेळाडूंसह ड्राफ्टमधील 145 खेळाडूंसाठी एकूण 3.9 कोटी कोटी खर्च केले होते.
थेट प्रसारण..
भारतातील पहिल्या-वहिल्या फ्रॅंचायझी आधारित खो-खो लीगच्या सीझन 2 मधील थरारक सामने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या क्रीडा वाहिनीवर थेट प्रसारित केले जाणार आहेत.