हिंजवडी – गौरी गणपतीच्या देखाव्यातून सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन, पर्यावरण तसेच ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सजावटी या माध्यमातून महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यामध्ये रणजित आबा कलाटे फाउंडेशन यशस्वी झाले आहे. असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी काढले. वाकड येथील रणजित आबा कलाटे फाउंडेशन आयोजित यावर्षीच्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच भाजपा चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे यांच्या अधिपत्याखाली रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे व रणजित कलाटे यांच्या पुढाकारातून वाकड कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळेनिलख परिसरातील महिलांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये 600 हुन अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
प्रास्तविकात स्नेहा कलाटे यांनी फाउंडेशनच्या तीन वर्षांचा कामकाजाचा आढावा घेत आशा स्पर्धेमुळे माझा हजारो महिलांशी जिव्हाळ्याचे संबंध तयार झाल्याचे सांगत त्यांनी वाकडमधील रहिवाशांच्या समस्या मूलभूत प्रश्न व अडचणींचा पाढा वाचला.
या वेळी अश्विनी कलाटे, राणी कलाटे, जिजाबाई कलाटे, दिपाली कलाटे, कल्याणी भुजबळ, सपना कलाटे, प्रज्ञा कलाटे, दीप्ती कलाटे, सपना भंडारे, दर्शना कलाटे, रतन कलाटे, पूनम मुरकुटे, अक्षदा शेडगे, सुप्रिया मानकर, हर्षा चौधरी, दीप्ती गर्ग, रतिषा कलाटे, रोहिणी कलाटे, प्रियांका कलाटे, आरती कलाटे, उन्नती कलाटे, छाया कलाटे, सारिका कलाटे, पूजा बुचडे , स्वाती कदम, शीतल चांदेकर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे ः प्रथम – विशाखा भागवत (टीव्ही), द्वितीय – हेमा नवले (फ्रीझ), तृतीय- स्नेहल मारवाडे (वॉशिंग मशीन), चतुर्थ – मीनाक्षी भोकरे (ओव्हन), पाचवा – सुचिता मोकाटे (गॅस शेगडी) याबरोबर उत्तेजनार्थ पंचवीस स्पर्धकांना मिक्सर, तर पाच लकी ड्रॉ विजेत्या महिलांना सोन्याची नथ व पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.