नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी येत्या 28 तारखेला (शनिवारी) लखनौला जाणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रियांका गांधी लखनौला जाणार आहेत.
आज प्रियांका गांधी, त्यांचे बंधू राहुल गांधी आणि “युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी हे राजघाटावर आयोजित “सत्याग्रह फॉर युनिटी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कॉंग्रेस पक्षाची स्थापना 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर 28 वर्षांनी 1885 साली झाली होती. भारतीय नागरिकांशी नागरी आणि राजकीय संवाद साधण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून कॉंग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली होती. देशभरातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्ष यावर्षी 135 वा स्थापना दिन साजरा केला जाणार आहे.