प्रियांका गांधी यांच्याकडून मौलान असद हुसैनी यांची भेट
मुझफ्फरनगर : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात (का) झालेल्या निदर्शनावेळी पोलिसांनी मदरशामधून अल्पवयीन मुलांना विनाकारण उचलून गजाआड केले, असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गाधी यांनी आज येथे केला.
पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या मौलाना असद हुसैनी यांची शनिवारी भेट घेतली. मदरशातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी काहीही संबंध नसताना अटक केली. त्यातील काहींची सुटका केली. तर काही जण अद्याप तुरूंगात खितपत पडले आहेत, असे प्रियांका गांधी यांनी सांगितले.
भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक छापलेले शुभेच्छापत्र प्रियांका गांधी नववर्षानिमित्त साऱ्यांना पाठवले आहे. उत्तर प्रदेशच्या प्रभारी असणाऱ्या प्रियांका यांचे हे शुभेच्छापत्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवले आहे.
या हिंसाचारात मरण पावलेल्या नूर महंमद यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. त्या म्हणाल्या, त्यांचे कुटुंबीय अनेक समस्यांना तोंड देत आहे. पोलिसांनी त्यांची मालमत्ता नष्ट केली आहे.