कोलकाता : शतकोत्तर जीवन जगणारे स्वातंत्र्य सैनिक भीमचंद्र जाना यांचे पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील मारोताला येथे वृध्दापकाळाने निधने झाले.
जाना हे 107 वर्षांचे होते. त्यांच्या मागे सहा मुले आणि सहा मुली आनि नातवंडे असा परिवार आहे. अलिकडेच त्यांची पत्नी लतिका यांचे निधन झाले होते.
परदेशी वस्तूवरील बहिष्काराच्या आंदोलानात सहभागाबद्दल 1930 मध्ये जाना यांना पहिल्यांदा कारावास घडला. त्यावेळी ते 17 वर्षांचे होते. त्यांना हावडा जिल्ह्यात जिगचा पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांची गाठ देशबंधू चित्तरंजन दास आणि त्यांची पत्नी वासंती देवी यांच्याशी पडली.
त्यांच्या प्रभावातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय झाले. त्यांनी अनेकदा कारावास भोगला. त्यांनी त्यांनी आयुष्भर गांधीवादाची मुल्ये जोपासली.